Wednesday, August 19, 2009

|| गणपती बाप्पा मोरया ||

गणपती आठवड्यावर येउन ठेपले आहेत तरी अजुनही पूर्वी सारखी चाहुल लागलेली नाही. सुमारे ५ वर्षांपूर्वी पर्यंत गणपती १ महिन्यावर आले तरी एक वेगळेच वातावरण जमुन यायचे. आता मात्र तसे जाणवत नाही. भोवतालचे वातावरण आपणच इतके वेगळे करून घेतले आहे की गणपती जवळ आलेत हे मित्रांच्या "हैप्पी गणेश चतुर्थी" च्या मेल्स आल्याशिवाय कळत नाही. कदाचित आपण हल्ली देवासाठी सुद्धा थोडेसे "busy" झालो आहोत. मी राहतो त्या सोसाइटी मध्ये आम्ही पोरं मिळून गणपती साजरा करायचो, गणपती तोच असला तरी गणपती उत्सव साजरा करणारे चहरे मात्र आता बदलले आहेत. कदाचित ह्यालाच सर्व लोक "मोठे होणे" असे म्हणतात. आता पूर्वी सारखे मित्रांमध्ये जाउन गणपती उत्सवाची तयारी करणे जमत नाही. काम अणि नोकरीमुळे ह्या सर्व गोष्टींकडे वेळ द्यायला वेळच उरत नाही. आता मात्र गणपती विसर्जनाच्या दिवशी सुद्धा काम अणि ऑफिस संभाळावे लागते. एरवी विसर्जनाच्या दिवशी कानावर ढोल ताशांचा आवाज यायचा ज्याची जागा आता ऑफिस मधल्या "keyboard" च्या टाइपिंगच्या आवाजाने घेतली आहे. खरच कधीकधी कळत नाही की आपण बदलले आहोत की आजुबाजुची परिस्थिती....

No comments:

Post a Comment