Monday, August 17, 2009

रविवारची भटकंती : माळशेज घाट

साधारणतः सकाळची १० ची वेळ असेल, माझ्या मोबाईल वर एक एसेमेस आला आणि लक्षत आले कि कदाचित कोणीतरी मेम्बर गळाला आहे. माझ्या पेर्सिस्टंट च्या मित्रांचा "भुलेश्वर" नामक ठिकाणी जायचा प्लान होता. नेहमी प्रमाणे रीतसर प्लान ठरल्या नंतर एक एक जण कलटी मारणे तसे आता नेहमीचेच झाले आहे. जेव्हा प्रत्यक्ष जायची वेळ आली तेव्हा लक्षात आले कि प्रचंड प्रतिसादा नंतर सुमारे ४ जणांची लक्षणीय संख्या जमू शकली आहे. आणि हे ४ जण म्हणजे: मी, माझी बायको, वैदी आणि त्याची बायको. तसे "भुलेश्वर" हे ठिकाण साधारण ४० km वर आहे पण आता हे फ़ॅमिली औटिंग झाल्यामुळे आम्ही निर्यण घेतला कि आपण "माळशेज घाट" ह्या ठिकाणी जाऊ.

"माळशेज घाट" पुण्यनगरी पासून १२० km अंतरावर आणि नाशिक - कल्याण ह्या मार्गावर आहे. घरातून निघायला १२ वाजले इथेच पहिली चूक झाली. घरातली काम करणारी बाई सकाळी ८:३० ला येते सांगून १०:१५ ला उगवली. तसा माझ्या बायकोला तिच्यावर जरा जास्तच कॉन्फिडंस आहे आणि तिने तो सार्थ (?) हि ठरवला. घरातल्या मुख्य गोष्टी (भांडी धुणे) उरकून झाल्यावर आम्ही १२ ला निघालो. पहिला स्टॉप खडकी रेल्वे स्टेशन होता जिथे दुसरे दाम्पत्य आमची वाट पाहत उभे होते. एखाद्या रिक्षावाल्याला थांबवावे इतक्या अदबीने त्यांनी हात दाखवून आम्हांला थांबविले. एव्हाना १२:३० ची वेळ झाली होती. पुढील संकटाची मी अगोदरच व्यवस्था करून ठेवलेली. नाशिक रोड वर दिसलेल्या पहिल्या पेट्रोल पंप वर मी गाडी नेली आणि लक्षात आले कि क्रेडीट कार्ड नामक लोकांच्या सोयीसाठी बनवलेली गोष्ट हे लोक स्वीकारत नाहीत. मनातल्या मनात २-४ शिव्या हाणत मी गाडी बाहेर काढली आणि ठरविले कि पुढल्या पेट्रोल पंप वर पेट्रोल टाकू. शेवटी शेल (Shell) मध्ये पेट्रोल भरून आम्ही पुढील प्रवासास निघालो.

जशीजशी हॉटेल्स दिसू लागली तसतशी भूक लागायला लागली. मग त्यामानाने जरा ठिकठाक दिसणाऱ्या एका हॉटेल मध्ये जेवण उरकून घेतले आणि मार्गस्थ झालो. माहित नाही का पण जेवल्या नंतर पुढील प्रत्येक हॉटेल जरा जास्त बरे वाटायला लागले होते. हॉटेल पासून १० km नंतर "आळेफाटा" हे ठिकाण आले जिथून आम्ही डावीकडे वळलो. रस्त्यात लावलेले बोर्ड्स पाहून कल्पना आली कि "ओझर" आणि "लेण्याद्री" हि अष्टविनायकाची ठिकाणे ह्या रोड वरून जाता येण्यासारखी आहेत. अपुर्वाला (माझी बेटर हाफ) अचानक "शिवनेरी" पहायची हुक्की आलेली जी आम्ही यशस्वीपणे दूर केली :). शिवनेरी येथून साधारण ३० km वर आहे.

सुमारे १०० km पुण्यापासून आल्यावर अजूनही माळशेज घाट का येत नाही असा मला प्रश्न पडला आणि तेव्हड्यात घाट सुरु झाल्याचे दिसले. पूर्ण घाट चढून वर गेल्यावर धबधबे दिसायला लागले. पाऊस इथेही नव्हता ह्याचेच काय ते दुखः. सर्वात जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे तिथे धुडगूस घालणारी पोरं. हि जागा फ़ॅमिलीला नेण्यासारखी आतातरी राहिलेली नाहीये. नेहमी नेहमी धबधबे बघायला मिळत नाहीत म्हणून त्यात भिजणे मी समजू शकतो पण म्हणून जोरजोरात शिवीगाळ करत भिजण्यात काय मजा आहे कळत नाही. त्या लोकांकडे पाहून ते अर्थिकद्रुश्ट्या मागासलेले वाटत होते. कदाचित आदिवासी सुद्धा
सधन वाटतील इतके कमी कपडे घातलेली पोरं भर रस्त्यात बसून नाचत होती. पोलिसांचा कदाचित असा समाज झाला असावा कि त्यांना पोलीस खातं इथे नेहमी येणारा थकवा दूर करण्यास पाठविते. एकूणच जागा छान असून पुन्हा येण्या सारखी नक्कीच नाहीये. शनिवार-रविवार तर मुळीच नाही. आम्ही तिथे साधारण २० min थांबून परतीच्या वाटेला निघालो.

येताना "ivy chateau indage" नावाच्या एका ठिकाणी चहा-कॉफी घेण्यास थांबलो. आत गेल्यावर मला "वाइन" बाँटल्स सोडून फारसे काहीच दिसले नाही. मग कळले कि हि जागा एका वाइन फॅक्टरी ची वाइन (Wine) कॅफे टाइप जागा आहे. फारच सुंदर जागा आहे. तिथे माझ्या मित्राने ४ बाटल्या पॅक करून घेतल्या कारण हि वाइन इथूनच बाहेर एक्स्पोर्ट होते. बाटल्या फारच भारी दिसतात, जो पीत नाही तोही सुरु करेल अशा असतात :). एकंदरीत त्याने हि ट्रीप सत्कारणी लावली म्हणायचे.

आम्ही घरी यायला ९:३० वाजले पण फारसा थकवा जाणविला नाही. एकदा जायलाच हि जागा ठीक आहे. दिवसाचा हायलाइट मात्र वाइन शॉप ठरले :). एकंदरीत दिवसाचे ९ तास कसे गेले कळले नाही...





3 comments:

  1. Abhya mitraaa mala tujha ha blog avadla.. chanla lihila aes..tujhya itar agamya blogs (mhanje barthat mala tyatla kahi kalat nahi mhanun) nantar ha blog tu marathit lihila ahes he pahun bara watla.. tujhi lihaychi shaili pan awadli.. masttttt re kambli!!!!!!!
    Ani aple bakiche mitra sagale mele ka ? tu aaj kal aaplya lokanbarobar trip vaigare kadhaychya farshya fandat padat nahis ka ??

    ReplyDelete
  2. Barve guruji, are pahila marathi post aavdali, chan jamali ahe, are tu jithe thamblas tithli wine mast aste ree, mi 2-3 vela tikade thambun aswad ghetaalay, pinara nasshil tari ekda test kar, pathimagach drashancha mala hi jar request keli astis tar pahayala dila astaa

    ReplyDelete
  3. abhijeet...majhya navacha spelling chukavla ahes!!! ghar ye..baghte tujhya kade ata.
    anyway, blog chan lihila ahes. kaam ajunahi suru zala nahiye ka?? :P

    ReplyDelete